बी. ए. भाग -३ दलित नाटकांची वैशिष्ट्ये मराठी नाटय परंपरेच्या इतिहासात दलित नाटकांचे वेगळे अस्तित्व आहे हे मान्य करायला हवे. आजपर्यंत लिहण्यात आलेली दलित नाटके ही सामाजिक परिवर्तनाची आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्रबिंदू आहेत. म्हणजेच सामाजिकतेला व परिवर्तनाला सामोरे जाणारे विचारप्रवाह दलित नाटकाला मंजूर आहेत. या देशातील समाजव्यवस्थेला एक जबरदस्त हादरा देणारे धारदार हत्यार म्हणून दलित नाटकाचे एक वेगळे अस्तित्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाट्य परंपरेतील नाटकीपणा दलित नाटकाला मान्य नाही. प्रस्थापित वर्गाकडून दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य दलित नाटकाने केले आहे. आपल्या वेदना दलित नाटककारांनी नाटक व एकांकिकातून मांडल्या. इतर दलित साहित्यप्रकाराप्रमाणे वेेदना, विद्रोह, नकार ही दलित नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. दलित नाटक सामाजिक दुःखातून जन्माला येते. दलित नाटकातून येणारा इतिहास हा केवळ एक इतिहास म्हणून येत नाही तर मानवी संस्कृतीची साक्ष म्हणून येतो. दलित नाटक हे इतिहासाचे गोडवे गा...